व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन

आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी संघटनात्मक पातळीवर महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 7, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Ajit Pawar rally at Kamshet maval

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी थेट पक्षाच्या सदस्यत्वासह जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक झाल्यानंतर प्रदीप गारटकर पुन्हा अजित पवारांशी जुळवून घेतील, अशी चर्चा होती. परंतु आता त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात अजित पवार यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे.

आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी संघटनात्मक पातळीवर महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. हीच सत्ता आगामी काळातही अबाधित राखण्यासाठी अजित पवारांनी मास्टर प्लॅन बनविला असून त्याअंतर्गत आता पुणे जिल्ह्यात पक्षाचे एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

संभाजी होळकर – बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांची जबाबदारी संभाजी नाना होळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. होळकर हे अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत काम करीत असून पक्षफुटीच्या काळातही ते अजित पवारांसोबत राहिले. जवळपास तेरा वर्षांहून अधिक काळ होळकर हे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

राजेंद्र कोरेकर – शिरूर, जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांची जबाबदारी राजेंद्र कोरेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि पक्ष संघटनेत सक्रीय कार्य करणारा नेता नव्हे कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

विठ्ठलराव शिंदे – राजगड, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांची जबाबदारी विठ्ठलराव शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, अजित पवार आणि आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू असलेले विठ्ठलराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुणे जाणते नेतृत्व आहे.

संभाजी होळकर, राजेंद्र कोरेकर आणि विठ्ठलराव शिंदे या तिघांवर तालुका विभागून पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदांची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आणि पक्ष संघटनेची जबाबदारी या तिघांवर असणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी


Previous Post

शिरगाव हद्दीतील अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; पाऊणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

वडगाव शहर भाजपाचे नेते दीपक भालेराव यांना मातृशोक ; शांताबाई भालेराव यांचे निधन । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon city BJP leader Deepak Bhalerao mother Shantabai Bhalerao passes away

वडगाव शहर भाजपाचे नेते दीपक भालेराव यांना मातृशोक ; शांताबाई भालेराव यांचे निधन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sanitation workers honored by women sisters of Shantai Residency in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील शांताई रेसिडेन्सीतील महिलाभगिनींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

February 23, 2026
Chairman and Vice Chairman of Maval Taluka Buying and Selling Association resign

मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती-उपसभापती यांचे राजीनामे ; नवीन कारभारी निवडीकडे तालुक्याचे लक्ष

February 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक

February 23, 2026
New executive committee of Maval Taluka Primary Teachers Association announced

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे

February 23, 2026
Construction of new office of Maval Taluka Agricultural Produce Market Committee completed

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नामदेव शेलार यांच्याकडून पदाचा राजीनामा

February 23, 2026
Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

February 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.