‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे’ अशी घणाघाती राज ठाकरे यांनी केली आहे. आज (दिनांक 2 जुलै ) रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुसंख्य आमदार सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झालेत. तसेच त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तसेच राष्ट्रवादीच्या अन्य 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
परंतू अचानक झालेल्या या राजकीय भूकंपामुळे राज्यातील नागरिक आणि राजकारणी देखील शॉक झाल्याचे दिसत आहे. अशीच एक प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून समोर आली आहे. ( Ajit Pawar joined Shinde Fadnavis government and became new Deputy Chief Minister Raj Thackeray Twitter post goes viral )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटलेत राज ठाकरे?
“आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला.
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?”
– राज ठाकरे
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
अधिक वाचा –
– ‘महा’राजकीय भूकंप । पक्षाचे 54 पैकी 30 आमदार सोबत आणि अजित पवारांसह 9 जण मंत्री, असं जुळलंय गणित, लगेच वाचा
– महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! सेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? राजकीय हालचालींना वेग