राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार हे राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार घेऊन आज (रविवार, दिनांक 2 जुलै) रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले. यासह त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सह राष्ट्रवादीचे अन्य 8 आमदार मंत्री बनले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
परंतू या सर्व प्रकाराची शरद पवार अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांना कल्पना होती का? त्यांना या बंडाची कल्पना होती का? शरद पवार यांचा या सर्व प्रकाराला पाठींबा आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अखेर शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले. ( Ajit Pawar joined Shinde Fadnavis government NCP chief Sharad Pawar press conference in Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटले शरद पवार?
– राष्ट्रवादीच्या नेत्यांना महाराष्ट्रात सरकारमध्ये घेतले, याचा अर्थ मोदींनी केलेले सर्व आरोप खोटे होते, हे मान्य केले.
– राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आज पक्षाच्या भुमिकेविरोधी भुमिका घेतली आहे.
– काही सहकाऱ्यांची भुमिका पुढील 2-3 दिवसांत सर्वांसमोर येईल.
– जे गेलेत त्यांनी जनतेसमोर येऊन सर्व गोष्टी सांगाव्यात. त्यांनी जर ही भुमिका स्पष्ट केली नाही तर ती पक्षाच्या विरोधी भुमिका होती असा त्याचा अर्थ होईल.
– आजचा प्रकार इतरांसाठी नवीन, माझ्यासाठी हा प्रकार नवीन नाही, यापूर्वी देखील मला हा अनुभव आला आहे.
– 1980 प्रमाणे आता पक्ष कसा उभारता येईल, हा माझा येत्या निवडणूकीत अजेंडा राहिल.
– उद्या कऱ्हाडला जाऊन प्रीती संगमावर य़शवंतराव चव्हाण यांचे दर्शन घेणार.
– उद्या पासून मी बाहेर पडणार आहे.
– उद्या एक जाहीर सभा घेऊन माझी भुमिका मांडणार.
– पक्षावर दावा करा, माझी काहीही भुमिका नाही.. माझा लोकांवर विश्वास आहे.
– आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भुमिका मांडू आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे.
– अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला, ही माहिती मला आज समजली.
– पक्षाचे नाव घेऊन कुणी काहीही भुमिका घेतली, ती त्यावर आम्ही भांडण करणार नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊ आणि त्यांच्या जवळ भुमिका मांडू.
– आमची खरी शक्ती सामन्य माणूस आणि कार्यकर्ता. पक्षाच्या कार्यकर्ते अस्वस्थ असणारच. पण कार्यकर्ते आणि सामान्य जनता आमच्या सोबत.
– पक्षाच्या धोरणा दृष्टीने जर कुणी वेगळी पाऊले टाकली असेल, तर त्यावर पक्ष वरीष्ट एकत्र निर्णय घेऊन कारवाई करतील.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री, ‘या’ 8 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, पाहा कोण-कोण यादीत?
– ‘महा’राजकीय भूकंप । पक्षाचे 54 पैकी 30 आमदार सोबत आणि अजित पवारांसह 9 जण मंत्री, असं जुळलंय गणित, लगेच वाचा