राज्याच्या राजकारणात आज एक वर्षाच्या अंतराने पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्यावेळी शिवसेना पक्ष फुटला होता, तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. यासह साडेतीन वर्षात तिसऱ्यांदा अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. ( Ajit Pawar New Deputy CM of Maharashtra State 8 MLA of NCP took oath as Ministers )
मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
- उपमुख्मंत्री – अजित पवार
- दुसरे मंत्री छगन भुजबळ
- तिसरे मंत्री दिलीप वळसे पाटील
- चौथे मंत्री हसन मुश्रीफ
- पाचवे मंत्री धनंजय मुंढे
- सहावे मंत्री धर्मरावबाबा आत्राम
- सातवे मंत्री अदिती तटकरे
- आठवे मंत्री संजय बनसोडे
- नववे मंत्री अनिल पाटील
अधिक वाचा –
– महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! सेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? राजकीय हालचालींना वेग
– ‘महा’राजकीय भूकंप । पक्षाचे 54 पैकी 30 आमदार सोबत आणि अजित पवारांसह 9 जण मंत्री, असं जुळलंय गणित, लगेच वाचा