Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी आज, गुरुवारी (दि. 5 डिसेंबर 2024) सहाव्यांदा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. तत्पुर्वी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि सतत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अजित पवार यांची यंदाही उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. राजकारणातील वादळांमध्ये अजित पवार अनेक वेळा अडचणीत आले, परंतु बारामतीतून ते आठ वेळा निवडून आले. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि नेतृत्वाने त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची परंपरा 1978 पासून सुरू झाली होती. नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री. त्यानंतर विविध काळात अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले. त्यातही अजित पवार यांनी या पदावर विक्रमी एकूण सहा वेळा काम केले आहे. (Ajit Pawar Oath as Deputy Chief Minister of Maharashtra)
नोव्हेंबर 2004 मध्ये आर. आर. पाटील यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि चार वर्षांपेक्षा अधिक काळ ते या पदावर होते. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या परिणामस्वरूप त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपदावर नियुक्त करण्यात आले, ते 10 नोव्हेंबर 2010 पर्यंत कार्यरत होते. भुजबळ यांच्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आणि तेव्हापासून ते सहा वेळा उपमुख्यमंत्री बनले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke