Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अग्रगण्य श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, युवा नेते पार्थ पवार, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्रत्री संजय भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पतसंस्थेच्या तळेगाव दाभाडे, कामशेत,देहू आणि सोमाटणे येथे शाखा असून मुख्य कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास मावळ तालुक्यातील संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक व नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्था पदाधिकारी यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविले इच्छुक उमेदवारांचे अर्ज
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच