Dainik Maval News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी ओझर्डे येथील आकाश हनुमंत पारखी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक वसंतराव कुटे यांनी आकाश पारखी यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेले आकाश हनुमंत पारखी यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे. उपाध्यक्ष म्हणून श्री. पारखी हे पदाला योग्य न्याय देतील आणि पक्षाच्या वाढीसाठी सक्रीय सहभाग घेतील, अशी आशा कार्यकर्ते आणि पक्षातील नेते व्यक्त करीत आहेत.
ओझर्डे गावचे रहिवासी असलेले आकाश पारखी हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात. ‘मी मावळा प्रतिष्ठान, मावळ’ या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच, ओझर्डे गावात शिवजयंती महोत्सव सुरुवात करण्यात त्यांनी पुढाकार घेतला असून शिवजयंती महोत्सव समितीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. यांसह विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेत नेहमीच सहभागी होतात. अशा व्यक्तीची मनसेकडून तालुका उपाध्यक्षपदी निवड होणे, ही सार्थ निवड असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मनसे पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचे सदस्य असलेले आकाश पारखी यांनी आजवर पक्षाची ध्येय – धोरणे, विचार तळागाळात पोहचविणे, पक्षादेशानुसार उपक्रम राबविणे, आंदोलन – मोर्चे यांच्यात सहभाग घेणे अशा कृतीतून आपला प्रामाणिकपणा दाखविला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांनी श्री. पारखी यांच्या याच प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून त्यांना उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे साहेब, आदरणीय अमित ठाकरे साहेब आणि तालुक्याचे अध्यक्ष श्री. अशोक कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वाढीसाठी काम करणार असून आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उपक्रम राबविणार आहे. – आकाश हनुमंत पारखी, उपाध्यक्ष, मावळ तालुका, मनसे
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
