Dainik Maval News : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (दि. 2 फेब्रुवारी) ते रविवार (दि. 9 फेब्रुवारी) दरम्यान यानिमित्ताने पहाटे काकड आरती, त्यानंतर सकाळी गाथा पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, रात्री कीर्तन आणि जागर असे विविध कार्यक्रम होणार आहे.
सोहळ्याची सुरुवात रविवारी (दि.2) होणार आहे. सकाळी महापूजा होईल. त्यादिवशी रात्री आठ वाजता यशोधन महाराज साखरे, सोमवारी (दि.3) जयंत महाराज बोधले, मंगळवारी (दि.4) उद्धव महाराज मंडले, बुधवारी (दि.5) चैतन्य महाराज देगलूरकर, गुरुवारी (दि.6) एकनाथ आबा वास्कर महाराज, शुक्रवारी (दि.7) न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री महाराज, शनिवारी (दि.8) वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे कीर्तन होईल.
- रविवारी (दि.9) सकाळी दहा वाजता सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. सोहळ्याच्या निमित्ताने दररोज सायंकाळी साडेचार वाजता हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे संत ‘तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’ हा अभंग चिंतनाचा कार्यक्रम होईल.
माघ शुद्ध दशमी सोहळ्याच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.7) दुपारी बारा वाजता गणेश शिंदे आणि प्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचा ‘तुका आकाशाएवढा’ हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित संगीतमय कार्यक्रम साजरा होणार आहे. तसेच दुपारी दीड वाजता डॉ भावार्थ देखणे यांचा बहुरूपी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले, ”संतभूमी श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर भव्य असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे मंदिर होत आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे हे जगातील सर्वात मोठे मंदिर असणार आहे. या मंदिराचे काम सुरु आहे. त्यासाठी भाविकांनी हातभार लावावा, आपापल्या पद्धतीने योगदान द्यावे.’ तसेच सप्ताह कालावधीत रोज भाविकांनी उपस्थित राहून प्रवचन, कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी