Dainik Maval News : पुणे जिल्ह्यासाठी आज, रविवारी (दि. २८ सप्टेंबर) रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासात जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मावळ तालुक्यात देखील पाऊस सुरू झाला असून पवन मावळ भागात पावसाचा जोर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पवना नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सद्यस्थितीमध्ये पवना धरण 100 टक्के भरलेले आहे आणि धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात 1400 क्युसेक विसर्ग सुरू होता, परंतु पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसास सुरुवात झाली असून सकाळी 10:30 वाजता नदीपात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून एकूण विसर्ग 2140 क्युसेक करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. तसेच सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्ष ( खडकवासला पाटबंधारे विभाग ) यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल