तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यामुळे मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहजिल्हाध्यक्ष विजय महाराज पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने मावळ तालुका अध्यक्ष म्हणुन शांताराम महाराज बोडके यांच्यासह पन्नास पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. ( All India Warkari Mandal Maval Taluka New Executive Announced Shantaram Bodke Apointed New President )
वारकरी सांप्रदायात मावळ तालुक्यात अखिल भारतीय वारकरी मंडळ चे संघटन मोठ्या प्रमाणात असुन मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात प्रामुख्याने शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, वारकरी शिक्षण, व्यसनमुक्ती, आरोग्य, गोरक्षा आदींसह पर्यावरण आणि गरीब – गरजुंना मदत केली जाते. हे कार्य अविरत चालू रहावे म्हणून गाव तेथे अखिल भारतीय वारकरी मंडळाची शाखा स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हा सहसचिव दिनकरबुवा निंबळे यांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुका कार्यकारिणी खालीलप्रमाणे;
शांताराम बोडके (अध्यक्ष), लक्ष्मण तळावडे( मुख्यसचिव ), नारायण केंडे (कोषाध्यक्ष ) सचिन ठाकर(प्रसिद्धी प्रमुख) अनुसया म्हस्के ( मार्गदर्शक ) वारकरी शिक्षण समिती नंदाराम जाधव, संजय बांदल, विश्वनाथ वाळुंजकर स्वच्छता आणि व्यसनमुक्ती समिती नंदाराम धनवे, बळीराम ढोले, शंकर मराठे सार्वजनिक मंदिर समिती शिवाजी राक्षे, सुखदेव गराडे, संजय खेंगले, बाजीराव ढोरे सप्ताह व दिंडी समिती बाळासाहेब गायकवाड, शंकर ढोरे, संजय ढोरे वारकरी सेवा समिती गोरख घोजगे, लक्ष्मण काळे, बाबासाहेब गाडे, योगेश भांगरे
महिला व बालसंस्कार समिती – संगिता फाळके, छाया काकरे, सुमन घरदाळे, सारीका निकम, सुषमा ओझरकर, कमल काकरे, मालन ढोरे, लक्ष्मी पऱ्हाड , सखु तिकोणे युवा समिती भाऊसाहेब काटे, शंकर लोहोर, भाऊसाहेब आंभोरे, गोरख तरस आरोग्य समिती आत्माराम शिंदे, विलास घारे, उद्धव कारके, शांताराम वायभट गोपालन समिती काशिनाथ भोंडवे, साहेबराव देशमुख, जगन्नाथ घारे, गणेश घोजगे
View this post on Instagram
यावेळी कोषाध्यक्ष भरत वरघडे, दतोबा भोते, नियोजन समिती सदस्य कुलदीप बोडके, तुकाराम भांगरे, विजय गाडे, दत्ता कड, सोपान खराबी या मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांसह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थित होते. आत्माराम शिंदे यांनी सुत्र संचालन तर दिनकर निंबळे यांनी आभार मानले . कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. ( All India Warkari Mandal Maval Taluka New Executive Announced Shantaram Bodke Apointed New President )
अधिक वाचा –
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, रविंद्र भेगडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
– Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रोजेक्टची पाहणी