आंबी (ता. मावळ) : आंबी येथील डॉ. डी.वाय. पाटील तंत्रशिक्षण संकूलातील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील (Padmabhushan Vasant Dada Patil College of Agriculture) 2010-2014 या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अर्थात गेट-टुगेदर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. रविवारी, दिनांक 7 एप्रिल रोजी आयोजित या मेळाव्याला 2010-14 च्या बॅचमधील एकूण 67 विद्यार्थी उपस्थित राहिले होते. तब्बल एका तपानंतर पुन्हा भेटलेल्या या सवंगड्यांचा आनंद अवर्णनीय होता. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस.एस. भगत सर हे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे. महाविद्यालयाच्या काळामध्ये ही सर्व मुले खुप कष्ट घ्यायची, त्याचीच फळे त्यांना मिळत आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमवावे अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.” ( Alumni gathering at Padma Bhushan Vasantdada Patil Agricultural College Ambi Maval )
“गेट-टुगेदर केल्याने आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये एकत्र राहून कायम एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका ठेवावी,” असे विचार महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक हेमंतकुमार डुंबरे यांनी व्यक्त केले. हेमंत कुमार डुंबरे हे सध्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे चे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.
“महाविद्यालयात शिकवत असताना मुलांना मी कामे वाटून द्यायची, त्याचा फायदा मुलांना भविष्यात व्यवसाय करताना झाला. ती मुले आता चांगला व्यवसाय करत आहेत, हे बघून खुप समाधान वाटते,” असे उद्गार महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रिया खर्डेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा भेटल्याने अतिशय आनंद झाला होता. कार्यक्रमाला सध्याचे प्रभारी प्राचार्य बी व्ही खोब्रागडे आणि अन्य प्राध्यपकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी किरण गोसावी आणि आभार प्रदर्शन विठ्ठल मोरे यांनी केले.
अधिक वाचा –
– गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजे गावातील छत्रपती शिवरायांच्या 16 फुटी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; संपूर्ण गाव झालं शिवमय
– ‘जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केलाय’
– अजितदादांच्या आदेशानुसार आप्पा बारणे यांना संपूर्ण सहकार्य – राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे । Maval Lok Sabha