व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तब्बल एका तपानंतर कॉलेजच्या कट्ट्यावर ‘ते’ पुन्हा भेटले..! आंबी येथील कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर

रविवारी, दिनांक 7 एप्रिल रोजी आयोजित या मेळाव्याला 2010 च्या बॅचमधील एकूण 67 विद्यार्थी उपस्थित राहिले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 11, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
alumni-gathering

Photo Courtesy : Team Dainik Maval


आंबी (ता. मावळ) : आंबी येथील डॉ. डी.वाय. पाटील तंत्रशिक्षण संकूलातील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील (Padmabhushan Vasant Dada Patil College of Agriculture) 2010-2014 या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अर्थात गेट-टुगेदर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. रविवारी, दिनांक 7 एप्रिल रोजी आयोजित या मेळाव्याला 2010-14 च्या बॅचमधील एकूण 67 विद्यार्थी उपस्थित राहिले होते. तब्बल एका तपानंतर पुन्हा भेटलेल्या या सवंगड्यांचा आनंद अवर्णनीय होता. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस.एस. भगत सर हे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे. महाविद्यालयाच्या काळामध्ये ही सर्व मुले खुप कष्ट घ्यायची, त्याचीच फळे त्यांना मिळत आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमवावे अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.” ( Alumni gathering at Padma Bhushan Vasantdada Patil Agricultural College Ambi Maval )

“गेट-टुगेदर केल्याने आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये एकत्र राहून कायम एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका ठेवावी,” असे विचार महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक हेमंतकुमार डुंबरे यांनी व्यक्त केले. हेमंत कुमार डुंबरे हे सध्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे चे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.

“महाविद्यालयात शिकवत असताना मुलांना मी कामे वाटून द्यायची, त्याचा फायदा मुलांना भविष्यात व्यवसाय करताना झाला. ती मुले आता चांगला व्यवसाय करत आहेत, हे बघून खुप समाधान वाटते,” असे उद्गार महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रिया खर्डेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा भेटल्याने अतिशय आनंद झाला होता. कार्यक्रमाला सध्याचे प्रभारी प्राचार्य बी व्ही खोब्रागडे आणि अन्य प्राध्यपकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी किरण गोसावी आणि आभार प्रदर्शन विठ्ठल मोरे यांनी केले.

अधिक वाचा –
– गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजे गावातील छत्रपती शिवरायांच्या 16 फुटी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; संपूर्ण गाव झालं शिवमय
– ‘जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केलाय’
– अजितदादांच्या आदेशानुसार आप्पा बारणे यांना संपूर्ण सहकार्य – राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे । Maval Lok Sabha 


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे मावळ भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न । Vadgaon Maval

Next Post

वर्षानुवर्षांची पायपीट थांबणार.. कळकराई-मोग्रज रस्त्याला वनविभागाचा हिरवा कंदील! कळकराईकरांना गुढीपाडव्याला गोड भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mograj-Kalkarai-Road

वर्षानुवर्षांची पायपीट थांबणार.. कळकराई-मोग्रज रस्त्याला वनविभागाचा हिरवा कंदील! कळकराईकरांना गुढीपाडव्याला गोड भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.