मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांसोबत बँकेत आलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरूवारी (दिनांक 19 ऑक्टोबर) तळेगाव दाभाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गेटवर घडली. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मनीषकुमार बिनोद दास (वय 27, रा. सुरसंड, सीतामढी, बिहार) याला अटक केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या पतीसह बँकेत कामानिमित्त जात होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा देखील होता. त्याने चालताना फिर्यादी महिलेचा हात सोडला. त्यावेळी संशयित आरोपी त्या मुलाचा हात पकडून त्याला आपल्यासोबत घेऊन जात होता. मुलगा दिसून न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला, तेव्हा तो संशयिताबरोबर जात असल्याचे दिसून आले. संशयिताला तत्काळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित हा मानसिक आजारी असावा. तो एकसारखा बडबड करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली. ( an attempt to kidnap child shocking incident in talegaon dabhade maval )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंची क्रेझच निराळी! गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर फडकवला वाढदिवसाचा बॅनर । MLA Sunil Shelke Birthday
– मावळ-मुळशी उपविभागात ‘इथे’ फटाके उडविण्यास बंदी, जाणून घ्या काय आहे कारण
– ‘राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी’, उद्योगमंत्र्यांनी जनरल मोटर्सच्या कामगारांना नेमके काय आश्वासन दिले? वाचा सविस्तर