पुणे मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (ओ) (यु) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी मावळ-मुळशी यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्यादृष्टीने शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात धुम्रपान करणे, कोणत्याही प्रकारचे दारू काम करणे, कोणत्याही प्रकारचे फटाके उडवणे या सर्व गोष्टीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ( Ban on bursting firecrackers in Maval Mulshi subdivision read in detail )
शोभेच्या दारू रॅकेटचे परिक्षणदेखील या परिसरात करता येणार नाही. सदर आदेश मावळ-मुळशी उपविभागात दिनांक 3 ते 15 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू राहतील. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 131 नुसार शिक्षेस पात्र राहील,असे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी कळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचताना बहरलीये ‘फुलराणी’, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा थक्क करणारा प्रवास
– ग्रामपंचायत निवडणूक Breaking! उमेदवारी अर्ज जमा करण्यासाठी वेळ वाढवली; घोषणापत्र प्रिंट करताना येतोय एरर, लगेच वाचा