तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या करवाढीला स्थगिती देणारा आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी (दि. 20) जारी केला. आमदार सुनिल शेळके यांच्या विनंतीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत नगर विभागाला सूचना केली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करपुनर्मूल्यांकन करुन शहरातील मिळकतधारकांना वाढीव कर आकारणीबाबत नोटीस बजावल्या होत्या. प्रस्तावित दरवाढ ही 50 ते 200 टक्के असल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. आमदार शेळके यांनी 12 जूनला मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शासनाने या बेकायदेशीर करवाढीला स्थगिती देण्याबाबत लेखी मागणी केली होती.नागरिकांनी वाढीव कर भरु नये तसेच करवाढी विरोधात हरकत नोंदवावी,असे आवाहनही त्यांनी केले होते. ( An order suspending tax hike of Talegaon Nagar Parishad has been issued by Urban Development Department )
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी वि.ना.धाईंजे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून वाढीव कर आकारणीस स्थगिती दिली आहे. नगरविकास खात्याच्या आदेशात म्हटले आहे की, सध्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये सन 2024-2025 ते सन 2027-2028 या कालावधीतील चतुर्थ वाषिक कर आकारणीची प्रक्रिया सुरु आहे. सदर प्रक्रियेबाबत मा.विधानसभा सदस्य यांनी वस्तुस्थिती नमूद करुन सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याची विनंती केली आहे.त्यावर मा.मुख्यमंत्री महोदयांनी,सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे सध्या “प्रशासक” असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम-169 अतंर्गत समिती अस्तित्वात नाही. सदर वस्तुस्थिती विचारात घेता, नविन अपिलीय समिती अस्तित्वात येईपर्यंत सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याबाबत आपणास कळविण्याचे मला निर्देश आहेत,असे मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
‘नगरपरिषदेने केलेल्या कर आकारणी विरोधात राज्य शासनाने जीआर काढून स्थगिती दिल्याबद्दल तळेगावातील जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानतो.’ – आमदार सुनिल शेळके
अधिक वाचा –
– चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी डीएपी खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन
– थरारक ! तळेगाव दाभाडे शहरात हवेत गोळीबार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण । Talegaon Dabhade
– माणूसपण हरवत चाललेल्या जगात माणूसकीचा नवा आदर्श घडवणारे मावळ तालुक्यातील ‘सावंतवाडी’ गाव आणि तेथील ग्रामस्थ !