लोणावळा जवळील खंडाळा इथे बुधवारी ( दिनांक 15 फेब्रुवारी ) रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात एका अनोळखी व्यक्तीची मृत्यू झाला आहे. खंडाळा येथील आयसीआयसीआय एटीएम शेजारील दगडी बंगला कमानीजवळ एका अज्ञात वाहनाची धडक बसल्याने 40 ते 45 वयोगटातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई भुषण कुँवर यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( An Unknown Person Died After Hitting By Unknown Vehicle At Khandala Near Lonavala City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदरहू व्यक्ती गंभीर जखमी होऊन गत झाली. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने वाहनासह पलायन केले आहे. सदर अज्ञात वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शकिल शेख या प्रकरणी तपास करत आहेत. जर त्या वाहनाविषयी कुणास माहिती असले तर आणि मृत व्यक्तीचे कोणी नातेवाईक अथवा ओळखीचे असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन लोणावळा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे पोलिसांचे बांधकाम व्यावसायिकांना महत्वाचे आवाहन, ‘जर कुणीही….’
– मावळ तालुक्यात ‘जंगलराज’ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल