जुना मुंबई पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मंगळवारी (दिनांक 29 ऑगस्ट 2023) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास जुण्या मुंबई पुणे हायवेवर तळेगाव दाभाडे इथे पायोनिअर हॉस्पिटलजवळ हा अपघात घडला. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पंढरी बाबळे (वय 26) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ( an unknown person died in a collision with an unknown vehicle on old Mumbai Pune highway )
हेही वाचा – ऑन ड्युटी सुखद धक्का : इनरव्हील क्लबकडून तळेगाव पोलिस ठाण्यात रक्षाबंधन, महिला पोलिसांनाही बांधल्या राख्या
प्राप्त फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भा.द.वी. कलम ३०४(अ), २७९, मो.वा.का.क. १८४,१३४(अ),(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख, वेळी आणि ठिकाणी एक अनोळखी पुरूष (वय अंदाजे 45 वर्षे) याला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. सदर अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने अविचाराने, भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याने सदर अपघात घडला आणि त्यात गंभीर जखमी झालेल्या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच वाहन चालक या घटनेची माहिती न देता पळून गेला आहे, अशी माहिती फिर्यादीत आहे. तळेगाव पोलिस सपोनि पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगावमध्ये ‘राखी विथ खाकी’ : मोरया प्रतिष्ठानच्या महिला सहकाऱ्यांनी पोलिस बांधवांना बांधली राखी
– आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) कार्यशाळेचे वडगाव इथे आयोजन
– चिमुकल्या हातांनी बनवलेल्या राख्या वर्गमित्रांच्या मनगटावर बांधल्या; चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे