व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ऑन ड्युटी सुखद धक्का : इनरव्हील क्लबकडून तळेगाव पोलिस ठाण्यात रक्षाबंधन, महिला पोलिसांनाही बांधल्या राख्या

देश व समाजाच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 30, 2023
in लोकल, मावळकट्टा, शहर
raksha-bandhan-2023

Photo Courtesy : Sandhya Thorat


बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र देश व समाजाच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. त्यामुळेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे तळेगाव पोलिस ठाण्यात पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. पोलिस बांधवांना ऑन ड्युटी असताना मिळालेला हा सुखद धक्का होता. ( women colleagues of inner wheel club tied rakhi to talegaon dabhade police )

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे मधील सभासदांनी आज, बुधवार (दिनांक 30 ऑगस्ट) रोजी तळेगाव दाभाडे लिंब फाटा पोलीस चौकीमधील पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. पोलिस हे समाजासाठी अविरत, अव्याहतपणे सेवा बजावत असतात. सामाजिक सुरक्षा आणि सलोख्यासाठी ते सदैव कर्तव्यावर असतात. सदैव ताणतणावाचा सामना करत असतात. त्यांच्या या त्यागाची जाणीव ठेवून रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने इनरव्हील क्लबच्या महिला सदस्यांनी कृतज्ञता म्हणून अध्यक्षा संध्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव पोलिस ठाण्यात रक्षाबंधन साजरे करण्याचे ठरवले.
हेही वाचा – वडगावमध्ये ‘राखी विथ खाकी’ : मोरया प्रतिष्ठानच्या महिला सहकाऱ्यांनी पोलिस बांधवांना बांधली राखी

खास बाब म्हणजे तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही राख्या बांधल्या. अनपेक्षित सुखद धक्क्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांनाही विशेष आनंद झाला. यावेळी अध्यक्षा संध्या थोरात यांनी इनरव्हील क्लब बद्दल थोडक्यात माहिती दिली. निशा पवार, रश्मी थोरात, संगीता शेडे, शर्मिला शहा आणि वैशाली जामखेडकर तसेच साधना भेगडे, ज्योती देशपांडे, शलाका वाणी, अरुणा कुलकर्णी, चांदनी गांधी, मोहिनी भेगडे आदी महिला भगिनी यांनी पोलिस बांधवांना शुभेच्छा देत रक्षाबंधन केले. ( women colleagues of inner wheel club tied rakhi to talegaon dabhade police )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) कार्यशाळेचे वडगाव इथे आयोजन
– चिमुकल्या हातांनी बनवलेल्या राख्या वर्गमित्रांच्या मनगटावर बांधल्या; चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे
– पंतप्रधान मोदींचे देशातील महिला-भगिनींना रक्षाबंधनाचे मोठे गिफ्ट; एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 200 रुपयाने कमी


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये ‘राखी विथ खाकी’ : मोरया प्रतिष्ठानच्या महिला सहकाऱ्यांनी पोलिस बांधवांना बांधली राखी

Next Post

जुना मुंबई पुणे हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

जुना मुंबई पुणे हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.