Dainik Maval News : धामणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी अनिकेत बाबुलाल गराडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी छाया सोमनाथ गराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष हनुमंतराव गराडे, संस्थेचे संचालक विक्रम गराडे, पंडीत गराडे, सतिश गराडे, गणेश गराडे, पांडुरंग गराडे, सिंधुताई गराडे, काळूराम गराडे रवि गराडे, अरुण गराडे आदी उपस्थित होते.
- मावळते चेअरमन पंडित गराडे व व्हाइस चेअरमन काळूराम गराडे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक झाली.
सदर निवडणुक प्रक्रिया वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मावळ यांचे कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. जे. तळपे व संस्थेचे सचिव गुलाब ढोरे यांनी निवड जाहिर केली. धामणे वि.का. सहकारी सोसायटी मावळ तालुक्यामध्ये अग्रगण्य सहकारी संस्था आहे. संस्थेने अनेक वेळा सभासदांना लाभांश वाटप केला असून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी, तसेच मध्यम अल्पमुदत, पिककर्ज वाटप करत आहे.
नवनिवार्चित चेअरमन, व्हॉइस चेअरमन यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला. माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, प्रशांत ढोरे, विक्रम गराडे, पंडीत गराडे यांनी शुभेच्छा दिल्या.