बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल मधील वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेस्टँम्प कंपनीचे विभागीय संचालक शरद गेहलोत, कायनेटिक टायिझिंग कंपनीचे प्रमुख व्यवसाय विकास अधिकारी गौतम लोढा, गेस्टँम्प कंपनीचे गटप्रमुख संतोष चव्हाण, मा उपसरपंच दत्ता असवले, अनिल मालपोटे, रुपेश घोजगे, नामदेव कोंडे, विजय सातकर, विकास आसवले, गजानन खरमारे, नारायण ठाकर, नामदेव शेलार, दत्ता असवले, प्रिया मालपोटे, ज्योती आंबेकर, प्रकाश मालपोटे, रवी पवार, रामनाथ असवले, दशरथ जांभुळकर, सागर म्हाळसकर, शेखर मालपोटे आदी कार्यक्रमास उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
टाकवे बुद्रुक या गावामध्ये हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच अगदी उत्साहात पार पडला. 2007 साली शाळेची सुरूवात केली. ग्रामीण भागातील मुले इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी येतात. या स्कूलमध्ये टाकवे, फळणे, खांडी, सावळा, वाहनगाव, वडेश्वर, माऊ, कशाळ, कल्हाट, पवळेवाडी, किवळे, बेलज, राजपुरी, घोनशेत, कचरेवाडी, साई, नानवली, पारोडी अशा अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी स्कूलमध्ये येत आहेत. ( annual convocation of Balraje Asawale English Medium School and Sarpanch Chindhu Maruti Asawale English Medium High School was full of excitement )
शेतकरी कुटूबातील तरूणांनी शाळा सुरू केली. कमीत कमी डोनेशन घेतले जाते. माफक फी आहे. वेगवेगळे उपक्रम असतात. दरवर्षी शाळेचा निकाल. 100 टक्के निकाल असतो. विद्यार्थाना मोठी स्वप्नं राबवण्याचा आत्मविश्वास इथे पहायला मिळतो. या स्कूलमधून अनेक विद्यार्थी वकील, डी फार्मसी, इंजिनियर झाले अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चिंधु असवले आणि सचिव रामदास जाखोबा वाडेकर यांनी दिली.
उपस्थित संचालक मंडळ तानाजी असवले खजिनदार उपाध्यक्ष मनोज जैन संचालक भूषण असवले, पांडुरंग मोढवे, राज खांडभोर, स्वामी जगताप, दत्ता गायकवाड, लक्ष्मण कुटे कार्यक्रमाचे नियोजन प्रिन्सिपल राज कांबळे आणि व्हाईस प्रिन्सिपल प्रियांका कुडे व सर्व शिक्षक स्टाफ यांनी केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी केले. प्रस्ताविक संचालक राज खांडभोर यांनी केले व आभार रामदास वाडेकर यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा –
– बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई
– मावळातील ‘दादा’ गटाची ताकद दिसणार! राष्ट्रवादीकडून आंदर मावळ विभागात शुक्रवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन