मावळ तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (शनिवार, दिनांक 19 ऑगस्ट) वडगाव मावळ संपन्न झाली. यावेळी एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
“सभासदांचा विश्वास आणि संचालकांची सचोटी यामुळे संस्थेचा कारभार पारदर्शक व प्रगतीपथावर आहे. 93 वर्षांची मोठी परंपरा असलेली ही सहकार चळवळ एकत्रितरीत्या जपण्याचा प्रयत्न करा” असे आवाहन सुनिल शेळके यांनी केले. तसेच संस्थेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी शुभेच्छा दिल्या. ( annual general meeting of maval taluka primary teachers cooperative credit institution was held at vadgaon )
सदर कार्यक्रमाला आमदार शेळकेंसह स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेशभाऊ साळवे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, वि. म. शिंदे, विस्तार अधिकारी शोभा वहिले, सुजाता शिंदे, चेअरमन नारायण कांबळे, व्हाईस चेअरमन सुरेखा औटी, कार्यकारी संचालक राहुल लंबाते, सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका अंजली जांभुळकर तसेच विद्यार्थी, पालक आणि सर्व सभासद उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेतमध्ये राहून ठाण्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला कल्याण पोलिसांकडून अटक । Maval Crime News
– पाटण गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; 160 महिलांची कार्यशाळेला उपस्थिती
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक संपन्न, आयुक्त सौरभ राव यांनी दिले महत्वाचे निर्देश