अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका आणि श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 23 जून) पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंडींचा आणि दिंडीतील प्रमुख, तसेच महिला वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विठूनामाचा गजर करित भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या वारकरी माऊलींना पायी वारी करताना मुलभूत आणि अत्यावश्यक वस्तूंची उणीव भासू नये, यासाठी मदतीचा हात म्हणून ताडपत्री आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. रविंद्र भेगडे यांच्या सहकार्यातून हभप प्रकाश महाराज बोधले आणि खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचा 14 वा वार्षिक कार्यपूर्ती अहवाल प्रकाशित करण्यात आला.
हभप प्रकाश महाराज बोधले आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी मनोगत व्यक्त केले. संतांचे अनुकरण करून काम करत राहिल्यास समाज त्यांच्या मागे उभा राहतो, याचा आदर्श म्हणून 14वर्षे सातत्याने श्री पोटोबा देवस्थान आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ कार्य करत आहे. सोपान म्हाळसकर यांची आठवण काढताना कामाचा पाठपुरावा कसा असावा हे सोपानअण्णा यांच्याकडून शिकणे सारखे होते. पुढील काळातही या कार्याला सर्वोतपरी मदत करणार, असे अश्वासन खासदार बारणेंनी दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे व अखिल भारतीय वारकरी मंडळचे तालुका अध्यक्ष शांताराम बोडके, संतोष कुंभार यांनी केले होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पगडे, शांताराम म्हाळसकर आणि माजी नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी महाप्रसादाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंता कुडे, सूत्रसंचालन हभप गणेश महाराज जांभळे आणि आभार नारायणराव ढोरे यांनी मानले. ( Annual report of Potoba Maharaj Devasthan Published Pandharpur Wari Warkari Honored at Vadgaon )
हभप मंगल महाराज जगताप, संतोष महाराज काळोखे, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे, शांताराम बोडके, दत्तात्रय लायगुडे उद्योजक शंकरराव शेळके, मावळ भाजपाचे भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गणेश गायकवाड, शांताराम कदम, प्रविण चव्हाण, पंढरीनाथ ढोरे, निलेश म्हाळसकर, बाळासाहेब म्हाळसकर, पंढरीनाथ भिलारे, प्रकाश कुडे, भाऊसाहेब ढोरे, नारायणराव ठाकर, मयूर ढोरे, नितीन कुडे, भरतशेठ म्हाळसकर, धनंजय नवघणे यांसह तालुक्यातील वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– बांधणी संघटनेची, तयारी विधानसभेची ! मावळ तालुका काँग्रेसकडून नव्या नियुक्त्या जाहीर, महिला तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती
– BREAKING ! मावळात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू
– शिळींबमधील ‘अंजनवेल’ येथे ‘द्रौपतीमाला पुष्प’ फुलांना बहर ! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी