विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा, असे आवाहन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी कान्हे येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात व्यक्त केले. भविष्यात शाळेला भौतिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे ध्वजारोहण ग्रुप ग्रामपंचायत कान्हेचे उपसरपंच श्री बाबाजी शंकर चोपडे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कारगिल योद्धा मेजर रामदास मदने व अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीपर मार्गदर्शन केले. माजी आदर्श सरपंच किसन दगडू सातकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना बक्षीस रूपाने मदत केली. यावेळी माजी उपसरपंच तसेच जि.प. प्रा. शाळा कान्हे शालेय समितीचे अध्यक्ष समीर सातकर यांच्या सहकार्याने शालेय नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिबिंब या हस्तलिखिताचे प्रकाशन संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ( Annual Reunion of Chhatrapati Shivaji Vidyamandir and Junior College Kanhe in presence of Bala Bhegde )
तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलादालन, विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कान्हेचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विजयराव सातकर सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, रोटरी क्लब ऑफ निगडी च्या फर्स्ट लेडी कमलजीत कौर, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ निगडी हरबिंदरसिंग दुल्लत, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे उध्दव चितळे,स्पेशल सर्विस डायरेक्टर गुरुदीप सिंग भोगल, दादासाहेब सावंत,सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे , महेशभाई शहा उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरच स्पर्धा परिक्षेची माहिती व्हावी यासाठी स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्था पातळीवर विविध उपक्रम तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या अध्यापिका श्रध्दा मोहोळ आणि कविता येवले मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सविता चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन प्रमुख रियाज तांबोळी, किरण गवारे , शिक्षक प्रतिनिधी राम कदमबांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा –
– दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! मावळ तालुक्याला मिळाले मोठे गिफ्ट, ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी तब्बल 333 कोटींचा निधी
– हिवाळी अधिवेशनातून मावळ तालुक्याला मिळणार मोठी गुड न्यूज! मावळवासियांची उत्कंठा शिगेला, कोणती घोषणा होणार?
– ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा । Actor Ravindra Berde Passed Away