जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा (दिनांक 12 मे) भरदिवसा खून करण्यात आला. या घटनेला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही गुन्ह्यातील मुख्य आरोपी भानू खळदे हा फरार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आणखी एका पथकाची स्थापना केली आहे. महत्वाचे म्हणजे या गुन्ह्याचा तपासासाठी पूर्वी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
किशोर आवारे यांच्या आई, तळेगावच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दिनांक 13 जून) लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि गुन्ह्याचा तपास जलद व पारदर्शी पद्धतीने व्हावा, अशी मागणी केली. यानंतर पोलिस आयुक्तांनी गुन्ह्याच्या तपासासाठी वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्यासह अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केली. ( Another Special Team To Investigate Kishore Aware Murder Case )
“किशोर आवारे प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीचा कार्यभार सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच, गुन्हे शाखेची दोन पथके तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आली असून, एसआयटीला अन्य एका पथकाची जोड देण्यात आली आहे,” अशी माहिती विनय कुमार चौबे ( पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड ) यांनी दिली.
किशोर आवारे हत्या प्रकरणात गौरव भानू खळदे (रा. तळेगाव), शाम अरुण निगडकर (46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (28, रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (32, रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे अद्याप फरार आहे.
अधिक वाचा –
– बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
– ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष