व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आषाढी वारी 2025 : दिंडीत कसं सहभागी व्हावं? देहू संस्थानने वारकरी भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म ; जाणून घ्या

संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव संत नारायण महाराज यांनी १६८५ साली आषाढी वारी पालखी सोहळा सुरू केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
warkari vari

File Image


Dainik Maval News : जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340 वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू येथून बुधवारी (दि. 18 जून) श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. हा सोहळा आता अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरातून लाखो वारकरी भाविक पालखीसह पंढरपूरला जाण्यासाठी श्रीक्षेत्र देहू आळंदी येथे येत आहेत. मागील काही वर्षांमध्ये वारीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली आहे, यासह काही समस्या उद्भवत आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांसाठी देहू संस्थानने प्रथमच आचार धर्म (नियमावली) प्रसिद्ध केला आहे.

संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव संत नारायण महाराज यांनी १६८५ साली आषाढी वारी पालखी सोहळा सुरू केला. शतकोनशतके स्वयंशिस्तीत सुरू असलेल्या ह्या सोहळ्याकडे पाहून जगभरातील नागरिक भारावून जातात. पूर्णपणे शिस्तीने चालणारा आषाढी वारी पायी पालखी सोहळा यंदाही अनुचित प्रकार न घडता, निर्विघ्नपणे पार पाडावा. हा सोहळा अधिक शिस्तप्रिय होण्यासाठी आणि नवीन सहभागी भाविकांना सोहळ्याचे नियम माहिती व्हावेत, यासाठी संस्थानने यंदा आचार धर्म (नियमावली) प्रसिद्ध केला आहे.

असा आहे आचारधर्म :
1. दिंडीतील सर्व पताका (वारकरी ध्वज) सुती कापड असलेल्या व काव रंगाचा वापर केलेल्या असाव्यात.
2. पताकाधारी यांच्या मागे टाळकरी, मृदंग वादक, विणेकरी, नंतर तुळशीवाली आणि महिला वारकरी असा क्रम असावा.
3. दिंडीतील वारकऱ्यांनी पांढरे शुभ्र धोतर, शर्ट, टोपी अथवा पायजमा परिधान करावा.
4. विणेकऱ्याने धोतर, फेटा परिधान करणे आवश्यक आहे.
5. दिंडीतील भजन हे वारकरी संप्रदायाच्या देहूकर फडाप्रमाणे असावे, भजन गौळण-हरिपाठ हे सांप्रदायिक चालीप्रमाणे असावे. (काकडा सकाळी लवकर व्हावा)
6. दिंडीत सहभागी होऊन कोणतेही व्यसन करू नये. दिंडीत चालताना सोहळा सोडून मागे-पुढे चालू नये.
7. रिंगणात दिंडीतील सर्व पताकावाले, टाळकरी, विणेकरी, तुळशी वाली, हांडेवाली, पखवाज सहभागी व्हावे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News


Previous Post

वडगावमध्ये रविवारी दिंडीतील सदस्यांचा सन्मान आणि श्री पोटोबा महाराज देवस्थानचा अहवाल प्रकाशन सोहळा । Vadgaon Maval

Next Post

देशी गायींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय ! २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
rajya mata gomata cow

देशी गायींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय ! २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.