व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश

यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Good news 24 schools in Maval taluka will become model schools Funds approved

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १४ जून २०२५ रोजी शुभारंभ होणार आहे. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

  • जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेबाबत कायापालट होणार आहे. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढेल आणि सीएसआरच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. एसटीईएम लॅब, संगणक लॅब व कोडींगच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार केले जाईल. जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण देण्यात येणार असून परकीय भाषा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जागतिक ज्ञान वाढेल.

विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळेल, ज्यामुळे सर्वासाठी समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी कळविले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News


Previous Post

प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियान : पुणे जिल्ह्यातून ९९ गावांची निवड, मावळ तालुक्यातील आठ गावांचा समावेश

Next Post

‘तू इथे धंदा करायचा नाही’ असे म्हणत रिक्षा चालकाला मारहाण ; शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

'तू इथे धंदा करायचा नाही' असे म्हणत रिक्षा चालकाला मारहाण ; शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.