Dainik Maval News : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून मावळातील पाचही जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. यापैकी कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्रभावी उमेदवार म्हणून आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांनी आघाडी घेतली असून त्यांच्या उमेदवारीला नागरिकांचा सकारात्मक पाठींबा मिळताना दिसत आहे.
आशाताई वायकर या सध्या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने कार्ला – खडकाळा गटात गावोगावी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन आपुलकीने संवाद साधत आहेत. याप्रसंगी ग्रामस्थांकडून त्यांचे उत्साहात स्वागत केले जात असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ. वायकर यांची जनसंपर्काची नाळ अधिक घट्ट होत असताना दिसत आहे.
नायगाव येथे उत्साहात स्वागत
गावभेट दौऱ्यात आशाताई वायकर यांनी रविवारी (दि. ३०) नायगाव येथे भेट दिली. याप्रसंगी नायगाव ग्रामस्थांनी आशाताई वायकर यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन सौ. वायकर यांनी नायगाव ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.
कार्ला ग्रामस्थांनी दिला आशीर्वाद
आशाताई वायकर यांच्या कार्ला येथे (दि. १) गावभेट उपक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील माता-भगिनींनी सौ. वायकर यांचे उत्साहात स्वागत केले. तसेच ग्रामस्थांनी आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयासाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. वायकर यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेऊन प्रत्येक घरात परिचय पत्रकाचे वाटप केले व ग्रामस्थांच्या गरजा, अडचणी व विकासाबाबत अपेक्षा जाणून घेतल्या.
गावभेट दौऱ्यातून होत असलेला लोकसंपर्क उपक्रमाद्वारे कार्ला – खडकाळा गटाच्या सर्वांगीण विकासासाठीच्या ठोस नियोजनाला अधिक बळकटी मिळत असून येथील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य व नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी आवश्यक उपक्रम राबविण्याचा निर्धार गावभेटीत अधिक दृढ झाल्याचे आशाताई वायकर यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाचे अनेक मान्यवर नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
