लोणावळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांची सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. अशोक साबळे हे यापुर्वी बीड जिल्ह्यात आंबेजोगाई इथे कार्यरत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सांगली महापालिकेतील उपायुक्तपद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे काही अधिकाऱ्यांना उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या रिक्त जागेवर पंडित पाटील यांची पदोन्नतीने महापालिका उपायुक्तपदी बदली झाली. पंडीत पाटील यांनी यापुर्वी जत नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले होते. ( Ashok Sable Appointent CEO of Lonavala Municipal Council Pandit Patil Transferred )
पंडित पाटील यांचे मूळगाव आरग (ता. मिरज) आहे. 2010 साली त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माझलगाव (जि. बीड) येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, साताऱ्यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले. लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून त्यांनी आपली छाप पाडली होती. या काळात लोणावळा नगर परिषदेला स्वच्छ शहर म्हणून देशात नामांकन मिळाले.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड, तब्बल ‘इतका’ बोनस मंजूर
– धक्कादायक! लोणावळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, पलटी होताना दोन दुचाकींना धडक, 3 जण जागीच ठार
– बंगळुरुमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची माळेगाव आश्रमशाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना 62 हजारांची मदत