मुंबई – पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा आणि खंडाळा दरम्यान एक भरधाव वेगातील कंटेनर पलटी होऊन त्याची धडक दोन दुचाकी गाड्यांना बसली. या अपघातात एका लहान मुलीसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. इतर तीन जण जखमी झाले आहेत. आज, शनिवार (दि. 11 नोव्हेंबर) दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना दिवसभर जाण्यास बंदी असताना देखील आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास पुण्याच्या बाजूकडून मुंबईच्या दिशेने हा एक कंटेनर जात होता. लोणावळा शहरातून जुन्या महामार्गाने पुढे गेल्यानंतर मयूर हॉटेल समोरील वळणावर हा कंटेनर अचानक पलटी झाला. तसाच घसरत पुढे जाऊन लोणावळ्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकी गाड्यांना त्याची धडक बसली. या अपघातात एक लहान मुलगी आणि दोन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मूल तसंच दोघेजण जखमी झाले आहेत. ( Container Accident Near Lonavala On Mumbai Pune Highway Three Kiled )
अतिशय भीषण असा हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं असून अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. लोणावळा शहरातून अवजड वाहनांना जाण्यास बंदी असताना देखील हा कंटेनर जुन्या हायवेने जात होता. त्याच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी लोणावळाकरचे किरण गायकवाड यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– शिळींब सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव धनवे यांचे दुःखद निधन! अंत्यविधीला जमला हजारोंचा जनसमुदाय
– मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती
– दिवाळीचा पहिला दिवा… शेकडो पणत्यांनी उजळला किल्ले लोहगड, डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो – पाहा