भारतरत्न पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त रविवार (25, डिसेंबर) रोजी वडगाव शहर भाजपा च्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा मंदिर प्रांगणामध्ये चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर चित्रकला स्पर्धेमध्ये सुमारे 200 विद्यार्थी आणि रांगोळी स्पर्धेमध्ये 50 महिलांनी सहभाग घेतला होता. ( atal bihari vajpayee birth anniversary Painting and Rangoli Competition at Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या विध्यार्थ्यांना नगरसेवक शंकर भोंडवे यांचे वतीने आणि रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धाकांना भाजपा मावळच्या मा युवती अध्यक्षा राणीताई म्हाळसकर यांचे वतीने गिफ्ट देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा शहर अध्यक्ष अनंता कुडे, सूत्रसंचालन सरचिटणीस मकरंद बवरे आणि आभार सरचिटणीस कल्पेश भोंडवे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा सरपंच संभाजी म्हाळसकर, मा उपसरपंच सुधाकर ढोरे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, देवस्थानचे पुजारी गोपाळराव गुरव, जेष्ठ नेते नितीन धर्माधिकारी, मा नगरसेवक रविंद्र काकडे, भुषण मुथा, रविंद्र म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, पवन भंडारी आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आघाडीच्या वतीने पूजा पिंगळे, श्रेया भंडारी यांनी रांगोळी स्पर्धेचे संयोजन केले. सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण आणि वडगाव भाजपा दिनदर्शिकाचे प्रकाशन शनिवार (दिनांक 31 डिसेंबर) रोजी श्री पोटोबा मंदिर प्रांगण मध्ये करण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– अटलजींच्या जयंतीनिमित्त आदिवासी मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप; प्रमोद शेलार यांच्या पुढाकारातून स्तुत्य उपक्रम
– गायरान जमिनीच्या विषयावर लवकर भुमिका स्पष्ट करावी… अन्यथा मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू – प्रकाश आंबेडकर