Dainik Maval News : वडगाव मावळ शहरातील केशवनगर भागात बुधवारी रात्री दोन चोरांनी पाच ते सहा रहिवासी इमारतीमध्ये जाऊन बंद असलेल्या घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. पहाटे एक ते साडेचार या दरम्यान वासुदेव निवासस्थान, राठोड श्रुती, समर्थ सोसायटी, वैष्णवी सोसायटी, केशव रेसिडेन्सी या सोसायट्यांमध्ये घरफोडी करून चोरीचा प्रयत्न केला.
आजूबाजूच्या सदनिकांच्या दरवाजाला कडी लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील सामान अस्ताव्यस्त केले. यात कोणतेही मौल्यवान ऐवज चोरीला गेले नाही. त्यामुळे अद्याप कोणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नाही.
चोर अंगात रेनकोट, डोक्यात टोपी, तोंडाला रुमाल असा पेहराव करून दुचाकीवर आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, एकाच दिवशी सहा इमारतींमध्ये हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime
– मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’
– लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख 81 हजारांची फसवूणक; मावळमधील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime