Dainik Maval News : ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ऑटोस प्रयास फाउंडेशनने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर फंडातून कडधे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुलभ शौचालयांची उभारणी केली आहे.
याचे उद्घाटन ऑटोस फायनान्सचे प्रमुख सुनील करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुशील साहेबराव शिंगाडे, विस्तार अधिकारी शोभा वहिले, ॲड सुभाष तुपे, सतीश मोहोळ, नितिन तुपे, गोरख जांभूळकर उपस्थितीत होते. साईनाथ आडकर यांनी याकरिता पाठपुरावा केला होता.
शाळेतील मुलींना आरोग्य स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ठुले यांनी केले. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी वातावरण मिळेल असे सांगत पालकांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News