Dainik Maval News : टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अविनाश असवले यांची, तर उपसरपंचपदी प्रिया मालपोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. टाकवे ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी (दि.5) ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
मावळत्या सरपंच सुवर्णा असवले व उपसरपंच प्रतीक्षा जाधव यांनी ठरल्याप्रमाणे पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने असवले व मालपोटे यांनी अविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी स्वाती शिंदे यांनी जाहीर केले.
अविनाश असवले यांना टाकवे ग्रामपंचायतीच्या इतिहासात सर्वाधिक तरुण सरपंच होण्याचा मान मिळाला असुन याअगोदर त्यांनी उपसरपंचपद देखील भुषविले होते. याप्रसंगी माजी सरपंच भुषण असवले, सुवर्णा असवले, परशुराम मालपोटे, प्रतिक्षा जाधव, आशा मदगे, संध्या असवले, ज्योती आंबेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अन्य सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, जलजीवन मिशन, सार्वजनिक शौचालये, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे, पाणी पुरवठा आदी प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सरपंच – उपसरपंच यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link