वडगाव मावळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पहिला कार्यगुण गौरव पुरस्कार मावळ तालुक्यातील सहारा वृद्धाश्रम या संस्थेस काल (बुधवार, दिनांक 31 मे) रोजी प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पिंपरी येथील मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी पुतळ्याजवळ हा पुरस्कार सोहळा पार पडला. रस्त्यावर सापडलेल्या अनाथ-निराधार आजी आजोबांचा विनामूल्य सांभाळ करणाऱ्या कुसवली (मावळ) येथील सहारा वृध्दाश्रम या संस्थेच्या प्रा. तृप्ती विजय जगताप व कमल काशिनाथ जगताप यांनी हा पुरस्कार स्विकारला. ( award to Sahara old age home at kusvali in Maval taluka )
पद्मश्री गिरीश प्रभुणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, आमदार उमा खापरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहायक आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जयंती महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक राजाभाऊ दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते.
“जनतेसाठी आपले आयुष्य वेचणा-या अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार सुरू झाला हि अत्यंत प्रेरणादायी बाब” असल्याचे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी यावेळी म्हटले. तर “सामाजिक कार्याला पाठबळ देणाऱ्या अहिल्यादेवींच्या नावाच्या या पुरस्कार परंपरेला महापालिकेच्या वतीने सदैव पाठबळ देण्यात येईल” असे आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या भाषणात म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ दुर्गे यांनी केले, तर विजय बोत्रे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– मळवंडी ठुले गावात खरीप हंगाम सभा; कृषि विभागाकडून भातपीक आणि योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– एक वर्षापूर्वी झालेल्या ‘त्या’ चोरीच्या गुन्ह्याचा वडगाव मावळ पोलिसांकडून छडा, मुद्देमालासह आरोपी गजाआड