Dainik Maval News : मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावात सोमवारी (दि. 14) संविधानाचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दारुंब्रे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच उमेश आगळे, उपसरपंच मयूर वाघोले, पठाण साहेब, माजी उपसरपंच गणेश सु. वाघोले, ग्रामपंचायत सदस्य अनिल वाघोले, श्रीकांत वाघोले, रामभाऊ ठाकर, रोहिदास वाघोले, संतोष वाघोले, शेखर आगळे, बंटी आगळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व महामानवला वंदन करण्यात आले.
भीमराव रामजी आंबेडकर अर्थात भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस फक्त देशभर नाही तर संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval