Dainik Maval News : मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या झालेल्या त्रैमासिक सभेमध्ये मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या सन 2025-26 च्या अध्यक्षपदी शिक्षक नेते बाबासाहेब औटी, उपाध्यक्षपदी केंद्रप्रमुख रघुनाथ मोरमारे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कार्यवाहपदी केंद्रप्रमुख सुहास धस, सहकार्यवाहपदी आदर्श शिक्षक धोंडिबा घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली..
याप्रसंगी औटी ग्रुपचे सेल्स डायरेक्टर गजानन डुबल यांना अमेरिकन विद्यापीठाची पी.एच.डी. मिळाल्याबद्दल तसेच मावळ शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अनिल कळसकर व कार्यकारी संचालक प्रमोद भोईर यांची निवड झाल्याबद्दल मावळ शिक्षक परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
- याप्रसंगी मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे संस्थापक राजू भेगडे , शिवाजी ठाकर,मावळते अध्यक्ष रामराव जगदाळे,मावळते कार्यवाह गणेश धिवार,तानाजी शिंदे, अमोल चव्हाण,सुभाष गोफणे,उमेश माळी ज्ञानेश्वर शिवणेकर,संजय ठुले, संदिप आडकर,गोकुळ लोंढे, धोंडिबा घारे,गोरख जांभूळकर, गंगासेन वाघमारे,कुंडलिक लोटे, अंकुश मोरमारे,संतोष राणे, नारायण गायकवाड,ज्ञानेश्वर मोरमारे,राहुल जाधव, प्रकाश भवार, मावळ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अनिल कळसकर,कार्यकारी संचालक प्रमोद भोईर,तसेच मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे संस्थापक राजू भेगडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सन २०२४-२५ या वर्षात प्रबोधन परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आढावा सादर करुन सरत्या वर्षाचे अध्यक्ष रामराव जगदाळे व कार्यवाहक गणेश धिवार यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. संस्थापक शिवाजी ठाकर यांनी नूतन पदाधिका-यांच्या निवडी जाहीर केल्या.
तसेच येणाऱ्या २०२५-२६ या वर्षात मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या वतीने मावळच्या दऱ्याखोऱ्यात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असलेल्या गुरुजनांसाठी वसंतचैतन्य व्याख्यानमाला. शिक्षक दिनानिमित्त नाटकाचा प्रयोग,स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड दुर्गदर्शन मोहिम, शिक्षक क्रिकेट स्पर्धा, शिक्षक स्नेहसंमेलन इत्यादींचे आयोजन करणार असल्याचा संकल्प व्यक्त केला.
- मावळते अध्यक्ष रामराव जगदाळे यांनी आपली अध्यक्षपदी निवड करुन मावळ शिक्षकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानून या पुढील काळात देखील सक्रिय सहभागी राहू असे सांगितले. मावळते कार्यवाह गणेश धिवार यांनी देखील यापुढील काळातदेखील जोमाने कार्य करत राहू असे सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब औटी यांनी जगदाळे सरांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार यापुढील काळातदेखील मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या वतीने शिक्षक परिवारासाठी विविध उपक्रम अगदी जोमाने राबवू असे सांगतानाच संपूर्ण मावळ शिक्षक परिवार हा एकदिलाने सहभागी होऊन कार्यक्रम संस्मरणीय कसे होतील यावर विशेष लक्ष देऊ असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमोल चव्हाण यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन