व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तांब्‍याच्‍या तारेला सोन्‍याचा मुलामा देऊन सराफा व्यावसायिकाची फसवणूक ; लोणावळा येथून दोघांना अटक । Maval Crime

तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देऊन ती तार सराफ व्यावसायिकाकडे ठेऊन त्याची फसवणूक केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 7, 2025
in लोकल, ग्रामीण
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देऊन ती तार सराफ व्यावसायिकाकडे ठेऊन त्याची फसवणूक केली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोघांना लोणावळा येथून अटक केली. गणेश शिवाजी भिंगारे (वय 36, रा. फणसडोंगरी पेण, ता. पेण, जि. रायगड), राकेश भवानजी पासड (वय 42, रा. अंबरनाथ वेस्ट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत गणेश दाभाडे हे सराफ व्यापारी आहेत. त्यांचे मावळ तालुक्यातील माळवाडी, इंदोरी येथे हरी ओम ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी (दि.3) दोघेजण दाभाडे यांच्या दुकानात आले. त्यांनी दाभाडे यांना बनावट सोन्याची चेन खरी असल्याचे भासवून दाभाडे यांना दिली. त्याबाबत आरोपींनी पावती देखील दाखवली. बाजारभावापेक्षा कमी किंमत देण्याची आरोपींनी मागणी केली.

  • आपला फायदा होत असल्याने दाभाडे यांनी ती चेन घेऊन आरोपींना 70 हजार रुपये दिले. त्यानंतर दाभाडे यांनी चेन घासून बघितली असता ती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला. आरोपींना लोणावळा येथून अटक करण्यात आली.

दाभाडे यांची फसवणूक करून मिळालेले 70 हजार रुपये आरोपींनी आपसात वाटून घेतले होते. त्यांच्याकडून ७० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपी तांब्याच्या तारेला सोन्याचा मुलामा देत आणि ते खरे सोने असल्याचे भासवून ते सराफ व्यावसायिकाकडे गहाण ठेवत असत. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर, पोलीस अंमलदार अनंत रावण, ज्ञानेश्वर सातकर, भीमराव खिलारे, विनायक शेरमाळे, स्वराज साठे, रमेश घुले यांच्या पथकाने केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

पवन मावळातील आंबेगाव परिसरात बिबट्या ; एकावर हल्ला, ग्रामस्थांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण । Leopard in Maval

Next Post

मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या अध्यक्षपदी बाबासाहेब औटी ; उपाध्यक्षपदी रघुनाथ मोरमारे यांची निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Babasaheb Auti as president Raghunath Mormare as vice-president of Maval Teachers Parivar

मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्या अध्यक्षपदी बाबासाहेब औटी ; उपाध्यक्षपदी रघुनाथ मोरमारे यांची निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.