व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर, वाचा अंदाजपत्रकातील प्रमुख मुद्दे । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 20, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. प्रशासक सुरेंद्र नवले आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकात स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते, नगरपरिषद नवीन इमारत बांधणी यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. एकूण 324 कोटी 78 लाख 77 हजार 111 रुपये जमेचे हे अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये 342 कोटी 76 लाख 16 हजार रुपये खर्च दर्शवला आहे. यावर्षी मालमत्ता कर वगळता इतर सुविधांच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

घरपट्टी, पाणीपट्टी, शासकीय अनुदान, अंशदान व शासकीय अर्थसहाय्य, नगरपरिषदेच्या स्थावर मालमत्तेचे भाड्याचे उत्पन्न, सेवा फी, नोंदणी, परवाना, ना हरकत प्रमाणपत्र, इमारत बांधकाम परवाना फी, ठेवींवरील व्याज यामधून नगरपरिषदेला 296 कोटी 2 लाख 77 हजार 500 रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. आगामी आर्थिक वर्षांत सर्व खर्च जाता 2 लाख 61 हजार 111 रुपये शिल्लक राहतील, असे सांगण्यात आले आहे. ( Balance Budget for financial year 2024-25 of Talegaon Dabhade Municipal Council )

नळ जोडणी, जाहिरात, जागा भाडे, नक्कल शुल्क, सर्वेअर, आर्किटेक, इंजिनिअर परवाना शुल्क, सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य प्रतिदिन आकार, ना हरकत दाखले शुल्क, ना हरकत दाखला व्यावसायिक प्रमाणपत्र शुल्क, मालमत्ता हस्तांतर शुल्क, नकाशाची खरी नक्कल शुल्क, नकाशाची खरी नक्कल बांधकाम शुल्क, इमारत पाडणे ना हरकत दाखला शुल्क, बांधकाम पाडल्याचे प्रमाणपत्र शुल्क, झोन दाखला शुल्क, भाग नकाशा शुल्क, केबल खोदकाम शुल्क या सुविधांचे कर वाढले आहेत.

कुठल्या विभागासाठी किती रक्कम –
अंदाजपत्रकात आस्थापना विभागाला 14 कोटी 25 लाख 80 हजार रुपये तर प्रशासकीय खर्चासाठी 25 कोटी 78 लाख 71 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपरिषद मालमत्तांची दुरुस्तीसाठी 6 कोटी 54 लाख 49 हजार रुपये. नवीन प्रशासकीय इमारत कामासाठी एक कोटी रुपये. भुयारी गटार योजनेसाठी 20 कोटी रुपये, नाट्यगृह बांधण्यासाठी 10 कोटी रुपये, रस्त्यांसाठी 4 कोटी रुपये, पाणीपुरवठा 20 कोटी रुपये, शाळा क्रीडांगण 2 कोटी रुपये, अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये, भाजी मंडईसाठी 3 कोटी रुपये, शिव शंभो स्मारक एक कोटी रुपये, प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी पुनर्वसन 3 कोटी रुपये, नमामि चंद्रभागा अंतर्गत 31 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांचा रुटमार्च । Vadgaon Maval Police Route March
– ‘शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू’, भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा
– वडगाव शहरात IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा छापा, अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 जणांविरोधात गुन्हा । Maval Crime


Previous Post

‘विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी नाहीतर…’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका

Next Post

सतत काम सांगतो म्हणून कामगाराने केला मॅनेजरचा खून, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना । Maval Taluka Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

सतत काम सांगतो म्हणून कामगाराने केला मॅनेजरचा खून, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना । Maval Taluka Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.