Dainik Maval News : कोथुर्णे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर, तर उपाध्यक्षपदी दादु कदम यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष यशवंत बोडके आणि उपाध्यक्ष गबळू काळे यांनी ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
या निवड प्रक्रियेत सोसायटीच्या अध्यक्षपदी मसुरकर बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी कदम यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी राकेश निखारे व सचिव रामदास पाठारे, संदिप साबळे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी संचालक ज्ञानेश्वर निंबळे, लक्ष्मण काळे, वाघू दळवी, यशवंत बोडके, संभाजी काळे, मथाबाई काळे, बाळु दळवी, गबळु काळे, सरपंच सुरेश दळवी, ज्ञानदेव सोनवणे, राम नढे, विठ्ठल दळवी भरत दळवी, संजय मोहोळ, रमेश कालेकर बाळासाहेब मोहोळ, भिमराव दळवी, सुर्यकांत दळवी,संजय दळवी, शिवाजी निंबळे, नामदेव दळवी, मारुती दळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना बाळासाहेब मसुरकर म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway

