Dainik Maval News : नायलॉन मांजा वापरल्याने होणाऱ्या गंभीर घटना लक्षात घेत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये नायलॉनचा मांजा वापरण्यास बंदी असल्याचे परिपत्रक मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी प्रसिद्ध केले आहे.
नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकाने, मार्केट, कार्यालय, संघटना यांना सुचित करण्यात आले आहे. राष्ट्रीय हरित लवाद यांचे आदेशान्वये पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार मनुष्यास, पक्षाला हानी करणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री, वाहतूक व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक हजार रुपये, तर साठवणूक, वाहतूक व विक्री करणारास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल असे परिपत्रकामध्ये नमूद केले आहे. या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’