राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्य विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे आज (रविवार, दिनांक 30 एप्रिल) रोजी मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. तत्पुर्वी त्यांच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली. यात एकेठिकाणी फ्लेक्सवर अजित पवार यांचा महाराष्ट्र राज्याचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख केल्याने या फ्लेक्सची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जुण्या मुंबई पुणे महामार्गावर जांभूळगाव फाटा इथे हा फ्लेक्स लावण्यात आला आहे. यात ‘भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे मावळ तालुक्यात सहर्ष स्वागत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या बॅनरवर अजितदादांसह राष्ट्रवादीचे नेते बापू भेगडे, गणेश खांडगे यांसह मावळचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचेही फोटो आहेत. ( banners mentioning ajit pawar as future CM of Maharashtra were put up by ncp activists in maval taluka )
खरे पाहता मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारचे फ्लेक्स लावले जात असल्याचे दिसत आहे. यावरुन मुख्यमंत्री पदासाठी आतापासूनच पायाभरणी केली जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र स्वतः अजितदादा पवार यांनी या कार्यकर्त्यांच्या भावना असून सध्या यावर बोलण्यासारखे काहीही नसल्याचे पुणे येथे बोलताना सांगितले होते. तसेच असे फ्लेक्स लावून संभ्रम पसरवण्याचे कारण नाही, मुख्यमंत्री कोण हे निवडणूक निकालानंतर समजेल असेही त्यांनी बोलताना सांगितले होते.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अंतिम निकाल! मविआच्या सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता, पाहा कुणाला किती मते मिळाली
– फिरायला जाताय? ट्राफिकमध्ये अडकाल… घाटात वाहनांच्या रांगाच रांगा । Mumbai Pune Expressway Traffic Jam