Dainik Maval News : मावळातील एका गावातील रस्त्यासाठी 42 लाख रुपये खर्च केले. पण रस्ता, पूलही अस्तित्वात नाही. त्यामुळे पूल, रस्ता हरवला आहे, अशा तक्रारी पोलीस स्टेशनला द्याव्यात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पुराव्यासह आमदार शेळके यांच्या विकासाचा पंचनामा करणार आहोत, असा इशारा भाजपाचे नेते गणेश भेगडे यांनी दिला.
मावळ विधानसभेतील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारार्थ आंदर मावळातील राजपुरी, बेलज, टाकवे, फळणे, माऊ, वडेश्वर नागाथली, वहाणगाव, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, कुसुर, खांडी, निळशी, सावळा, माळेगाव खुर्द, तळपेवाडी आदी गावांमध्ये प्रचारदौरा झाला. मतदारांनी प्रत्येक गावात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत स्वागत केले.
यावेळी या सर्व गावांतील ग्रामस्थांसह शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश भेगडे म्हणाले की, तालुक्यात कार्यकर्ते संकल्पना संपुष्टात आणली आहे. मलिदा गँगचे यांचे कार्यकर्ते असतील, तर यांचा अध्यक्ष कोण ? आमदार शेळकेंच्या भोवतीच पोलिसांचा गराडा असेल, तर ते नागरिकांना सुरक्षा काय देणार ? असा सवालही गणेश भेगडे यांनी केला.
गावगाडा चालवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. टाकवे गावातून कंपन्या बाहेर का गेल्या, दूध व्यवसाय येथून स्थलांतरित का झाले याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे का नाही ? कान्हे येथील पूल अद्याप का केला गेला नाही. हा पूल झाला असता तर इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. इंडस्ट्रीज बाहेर गेल्यामुळे तरुणांना रोजगार देणे देखील कठीण बनले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात हा पूल होणं आवश्यक होतं. महिला सक्षमीकरण तरुणांच्या हाताला काम हेच आपले व्हिजन आहे. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– पोलिसांनी जप्त केलेली रक्कम माझ्या व्यवसायाची, विरोधकांनी दबाव आणून कारवाई करण्यास भाग पाडले – सचिन मुऱ्हे
– मावळात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यालयातून 36 लाखांची रोकड जप्त, सोमाटणे येथे मोठी कारवाई । Maval Crime