व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जनतेकडून मला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांकडून ‘रडीचा डाव’ सुरु – सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

आपल्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली - शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 11, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
MLA Sunil Shelke reaction after filing complaint with Shirgaon police Maval Bapu Bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आपल्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी खोट्या तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे, या शब्दांत सुनील शेळके यांनी विरोधकांच्या तक्रारीला निकाली काढले.

आमदार शेळके यांनी जाहीर प्रचाराची वेळ संपल्यानंतरही आढले खुर्द व चांदखेड येथे रात्री प्रचार केल्याची तक्रार विरोधकांकडून शिरगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्याबाबत आमदार शेळके यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर प्रतिहल्ला चढवला.

शेळके म्हणाले की, गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे प्रत्येक गावात मतदारांकडून मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. समोर पराभव दिसू लागल्यामुळे जनतेच्या दरबारात लढण्याऐवजी त्यांनी पोलीस स्टेशनची पायरी चढली आहे. यावरून त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचल्याचे दिसून येते.

जनता मला भेटायला आतुर आहे उत्सुक आहे. माझ्या येण्याची वाट पाहत लोक तासनतास थांबतात. मी पोचल्यानंतर माझ्याशी संवाद साधतात. उमेदवार म्हणून मी निवडणुकीचे सर्व नियम पाळत आहे. विरोधकांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून तसेच खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

विरोधकांच्या असल्या खेळीला मी फारसे महत्त्व देत नाही. मावळची जनता येत्या 20 तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,असे ते म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– पोलिसांनी जप्त केलेली रक्कम माझ्या व्यवसायाची, विरोधकांनी दबाव आणून कारवाई करण्यास भाग पाडले – सचिन मुऱ्हे
– मावळात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यालयातून 36 लाखांची रोकड जप्त, सोमाटणे येथे मोठी कारवाई । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

इतरांची पत्रे दाखवताय आधी भाजपच्या पाठींब्याचे पत्र दाखवा ; भाजपच्या शहराध्यक्षांनी पक्षातील बंडखोर नेत्यांना धू-धू धूतलं

Next Post

आमदार शेळकेंच्या विकासाचा पुराव्यानिशी पंचनामा करणार : भेगडे । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bapu Bhegde criticism of Sunil Shelke after bridge in Takve BK village not completed

आमदार शेळकेंच्या विकासाचा पुराव्यानिशी पंचनामा करणार : भेगडे । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.