Dainik Maval News : मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले आहेत. गुन्हेगारी वाढली आहे, खून, अपहरण, महिला अत्याचार या गोष्टी घडत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर मावळचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी व्यक्त केली. शांत, सुंदर, निसर्गसंपन्न मावळ घडवायचा असेल तर परिवर्तन घडवा.
अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे आंदर मावळातील निगडे येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मावळ तालुका खादी ग्रामोद्योगचे माजी व्हाईस चेअरमन गणेश भांगरे, संदेश शेलार, चंद्रकांत करके, संतोष भांगरे, विशाल पाठारे, अर्चनाताई भांगरे, गणेश कल्हाटकर, रवीभाऊ शेटे उपस्थित होते.
गणेश भेगडे म्हणाले, की बापूसाहेब भेगडे स्वतः कंपनी मालक आहेत आणि त्यांनी आजपर्यंत अनेक मुलांना कंपनीमध्ये नोकरीही दिली आहे. त्यामुळे मावळातील मतदारांची आमदार म्हणून पसंती बापूसाहेब भेगडे यांनाच आहे, असा ठाम विश्वासही गणेश भेगडे यांनी व्यक्त केला.
- तालुक्यातील अनेक गावांमध्ये 18 ते 22 वर्षाची मुले मद्य व्यसन करतात, भर दिवसा हवेत गोळीबार करतात. या गोष्टी बघितल्यास आपला मावळ कुठे चालला आहे, हे दिसते. विकासाचा नुसता बागुलबुवा सुरू आहे. अनेक रस्त्याची कामे झाली, तिथे पाट्या लावल्या, पण प्रत्यक्षात रस्ताच गायब असल्याची स्थिती आहे. आपटी गावात 37 कोटीची कामे झाली. मात्र, प्रत्यक्षात 37 हजाराचीही कामे झालेली नाहीत, हे वास्तव आहे. मावळ तालुक्यात 13 धरणे आहेत, तरीही मावळ वासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ही समस्या गेल्या पाच वर्षात सोडवता येऊ शकली असती. पण तसे झाले नाही, असे बापूसाहेब भेगडे म्हणाले.
मावळातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे व्हिजन असलेल्या उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजे. तालुक्याची बिघडत चाललेली संस्कृती व्यवस्थित करणारा, मुलींचे पालकत्व घेणारा आमदार हवा आहे. – गणेश भेगडे, भाजपा नेते
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वातावरण तापलं ! मावळात शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात
– कार्ला, कुसगाव, ओळकाईवाडी येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांचे सशस्त्र पथ संचलन । Lonavala Police
– दुकाने, मॉल आणि महिला बचत गट येथील कामगार वर्गात मतदान करण्याविषयी जनजागृती