व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘वरून पिपाणी – आतून तुतारी’ अशी विरोधकांची अवस्था, भाजपचा सच्चा कार्यकर्ता तुतारीचा प्रचार करणार नाही : दाभाडे

पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी सुनील शेळके यांना मतदान करा - संतोष दाभाडे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 11, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
True BJP worker will not campaign trumpet Santosh Dabhade Talegaon Sunil Shelke Rally

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी मावळातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदान करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घ्यावेत, असे आवाहन तळेगाव दाभाडे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संतोष हरीभाऊ दाभाडे पाटील यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा या पक्षांनी अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिल्यामुळे बापूसाहेब भेगडे यांच्या नावावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी यू-टर्न घेतला असून सर्व प्रकारच्या दबावाला झुगारून आता भाजपचे पक्षनिष्ठ नेते व कार्यकर्ते उघडपणे आमदार शेळके यांच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत आहेत.

  • तळेगावमध्ये आमच्या दाभाडे परिवारातील 99 टक्के घरे ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस बरोबर आहेत. दोन-तीन घरे मात्र पहिल्यापासून जनसंघ, भाजपशी एकनिष्ठ आहेत. मी भारतीय जनता पक्षाचा तळेगाव शहराध्यक्ष आहे. सर्वांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचे काम करायचे आहे, हा पक्षाचा आदेश आहे. मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती, असे संतोष दाभाडे यांनी सांगितले.

सुनील शेळके यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची कामे महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत.  आमदार शेळके यांनी मुलांचे शाळा-महाविद्यालयातील प्रवेश, मोफत वैद्यकीय उपचार, हॉस्पिटलच्या बिलांमध्ये सूट, नोकरी, व्यवसायासाठी मदत अशी लोकांची कितीतरी वैयक्तिक कामे करून मदत केली आहे, याची संतोष दाभाडे यांनी उपस्थितांना आठवण करून दिली.

‘वरून पिपाणी, आतून तुतारी’
बापूसाहेब भेगडे यांची प्रतिमा ‘सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार’ म्हणून उभी करण्यात येत असून त्यांना पिपाणी हे चिन्ह मिळाले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा यांनी अधिकृत पाठिंबा दिल्यामुळे ते महाविकास आघाडीचेच अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वरून पिपाणी आणि आतून तुतारी, अशी विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते कधीही तुतारीचा प्रचार करणार नाहीत, असे संतोष दाभाडे म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वातावरण तापलं ! मावळात शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात
– कार्ला, कुसगाव, ओळकाईवाडी येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांचे सशस्त्र पथ संचलन । Lonavala Police
– दुकाने, मॉल आणि महिला बचत गट येथील कामगार वर्गात मतदान करण्याविषयी जनजागृती


Previous Post

मावळची संस्कृती बिघडत चालल्याने सर्व पक्ष एक झाले – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Next Post

इतरांची पत्रे दाखवताय आधी भाजपच्या पाठींब्याचे पत्र दाखवा ; भाजपच्या शहराध्यक्षांनी पक्षातील बंडखोर नेत्यांना धू-धू धूतलं

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla sunil shelke

इतरांची पत्रे दाखवताय आधी भाजपच्या पाठींब्याचे पत्र दाखवा ; भाजपच्या शहराध्यक्षांनी पक्षातील बंडखोर नेत्यांना धू-धू धूतलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.