Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापूसाहेब जयवंतराव भेगडे ( Bapusaheb Bhegade ) हे आज, सोमवारी (दि.28) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिवाळीचा पहिलाच दिवस अर्थात वसुबारस या शुभमुहूर्तावर बापूसाहेब भेगडे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत.
बापूसाहेब भेगडे अर्ज दाखल करत असताना त्यांच्यासोबत सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच वडगाव मावळ येथील पंचायत समिती चौकात सभेची जोरात तयारी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी सुनिल शेळके यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाख केला. त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. त्या गर्दीच्या तोडीस तोड गर्दी आज करण्याचा मानस बापूसाहेब भेगडे यांच्या कार्यकर्त्यांचा आहे.
वडगावमधील खंडोबा मंदिर चौकापासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य पदयात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर ही पदयात्रा संपूर्ण वडगाव बाजारपेठेतून पंचायत समिती चौकात जाइल, सभा स्थानी सर्वजण पोहोचतील. त्यानंतर बापूसाहेब भेगडे दुपारी 12 वाजता वडगाव मावळ तहसील कार्यालयात अर्थात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वडगाव मावळ पंचायत समिती चौक येथील मंचावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने भेगडे यांचे समर्थक आणि त्यांच्या सोबतच्या नेते, कार्यकर्त्यांची गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे. या सभेला अनेक ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करतील. तसेच भाजपाचे काही वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील. मावळ मतदारसंघातील नागरिकांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा दावा बापूसाहेब भेगडे यांनी केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश
– मावळात ‘अपक्ष’ उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा ? लवकरच होणार घोषणा । Maval Vidhan Sabha
– मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ विधानसभेत मतदार जनजागृती अभियान, विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी । Maval Vidhan Sabha