व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 8, 2024
in महाराष्ट्र
CM Eknath Shinde

Photo Courtesy : FB / CMO


Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना दिला.

छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : नानासाहेब नवले यांना निवृत्तीचा सल्ला देत अजितदादांनी टाकलाय नवा राजकीय डाव ? । Ajit Pawar
– आई माऊलीचा उदो उदो… कार्ला गडावर गर्दीचा उच्चांक, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर । Karla News
– अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News


Previous Post

पुणे जिल्हा महिला पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी मोनिका कचरे यांची निवड, पहिल्यांदाच मावळला मिळाला मान

Next Post

सदापुर गावातील युवा कार्यकर्त्यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
youth activists of Sadapur village joined NCP party In presence of MLA Sunil Shelke

सदापुर गावातील युवा कार्यकर्त्यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.