सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष संघटनेत काही बदल करत असून नियुक्त्यांचा जणू सपाटाच लावला आहे. भारतीय जनता पार्टी कडून देखील संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( Bharatiya Janata Party Announced Appointment Of 70 New District Presidents In Maharashtra )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीवेळी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मला खात्री आहे, माझे नवनियुक्त… pic.twitter.com/IsjhbulTz1
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) July 19, 2023
पश्चिम महाराष्ट्र विभागात मोठे बदल….
नव्याने जिल्हाध्यक्ष जाहीर करत असताना भाजपासाठी महत्वपूर्ण भाग असलेल्या पश्चिम महाराष्ट्र यात खासकरुन पुणे भागात पक्षाने दांडग्या नेतृत्वांवर जबाबदारी दिल्याचे दिसत आहे. यात पुणे मावळ प्रदेशासाठी शरद आनंदराव बुट्टे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( Bharatiya Janata Party Announced Appointment Of 70 New District Presidents In Maharashtra )
अधिक वाचा –
– तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड । Maval Politics News
– टाकवे बुद्रुकमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षांनी अनुभवले शाळेतील “ते” दिवस…