भारतीय जनता पार्टी मावळ तालुका टाकवे – वडेश्वर गटातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आज शुक्रवारी (दिनांक 25 ऑगस्ट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये सावळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच नामदेव गोंटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शरद बूट्टे पाटील आणि तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी स्वागत केले. ( Bharatiya Janata Party Maval Vidhan Sabha party entry and Worker Meet )
नामदेव गोंटे यांच्याबरोबर अनसूटे गावातील नथू मोधळे, बंडू लष्करी, राजाराम मोधळे, काळूराम शिवेकर, प्रकाश घाग, नाना मोधळे, चहादू घाग, संजू जगताप, रमेश टाकळकर, कुंडलिक मोधळे, निवृत्ती मोधळे, मुक्ताताई मोधळे इत्यादी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बदलतोय. देशातील जनतेच्या हिताचा विचार करत मोदी सरकार कल्याणकारी निर्णय घेत आहे. मोदीजींच्या या दूरदर्शी विचारांनी आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन युवा वर्गापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण भाजपात प्रवेश करत आहेत. कारण देशातील सर्व नागरिकांना हा विश्वास आहे की देशाच्या विकासाला मोदीजींच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, याचं प्रेरणेतून आंदर मावळ भागातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला” अशी माहिती रविंद्र भेगडे यांनी दिली.
महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात कष्टकरी आणि शेतकर्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. सामान्य नागरिकांनाही सरकारच्या या विविध योजनांचा लाभ घेता यावा, योजनांची माहिती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय वडगाव मावळ मोफत अर्ज भरण्याची सुविधा कार्यान्वित केली असून याचा देखील नागरिकांनी लाभ घ्या, अशी माहिती मावळ भाजपा तालुका अध्यक्ष तथा भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली.
कार्यकर्ता मेळाव्याला मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी, माजी पं. स. सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, रामदास गाडे, यदुनाथ चोरघे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, कल्याणी ठाकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव कोंडे, गणेश गायकवाड, किरण राक्षे, गणेश कल्हाटकर, रोहिदास असवले, रवि शेटे, विजू टाकवे, पुंडलिक खांडभोर, अरुण कूटे, अमोल भोईरकर, विशाल भांगरे, सचिन पांगारे, इंदाराम उंडे, लक्ष्मण तळावडे, सुरेश आलम, रामदास आलम, सतीश सावंत इत्यादींसह गटातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Bharatiya Janata Party Maval Vidhan Sabha party entry and Worker Meet )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– रिक्षा चालकाने अचानक टर्न मारल्याने अपघात, मावळमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू, चाकण-शिक्रापूर रोडवरील घटना
– Breaking! कुंडमळा इथे दोन मुले बुडाली, एकाचे शव शोधपथकाच्या हाती, दुसऱ्याचा शोध सुरु
– अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल – अदिती तटकरे; वाचा काय आहेत मागण्या?