Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी पक्षाचे पुणे जिल्हा (उत्तर) चे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी पक्षाच्या पुणे जिल्हा उत्तर या संघनात्मक जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत मावळ तालुक्यातील भाजपाच्या अनेक ज्येष्ठ, वरिष्ठ आणि जुन्या कार्यकर्त्यांची पदांवर वर्णी लागली आहे.
सदुंबरे (ता. मावळ) येथील सविता शिवाजी गावडे यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देहूगाव येथील संतोष सदाशिव हगवणे यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मावळ भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा वेहेरगाव (ता. मावळ) येथील सायली जितेंद्र बोत्रे यांची महिला मोर्चा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तसेच भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते लोहगड (ता. मावळ) येथील गणेश बबन धानिवले यांची अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यासह देहूरोड (ता. मावळ) येथीस किरण गोपीनाथ राक्षे यांची कामगार आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे येथील अक्षय कृष्ण पंडित यांची बुद्धीजिवी आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, लोणावळा (ता. मावळ) येथील नवीन रतनचंज भुरट यांची जैन प्रकोष्ठ आघाडी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाच्या जिल्हा संघटना कार्यकारिणीत संधी मिळालेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे पक्षाचे पुणे जिल्हा (उत्तर) चे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री सहकार आणि नागरी हवाई वाहतूक खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे, आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (उत्तर) ची कार्यकारणी जाहीर करत असल्याचे प्रदीप कंद यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम


